धार्मिक स्थळे सुरू करा, रोहित पवारांची मागणी

| पुणे | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरे आणि धार्मिस्थळे सुरू करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे पर्युषण पर्व काळात मंदिरे खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रे सादर करून मंदिरं खुली करता येणार नसल्याचे म्हटलेले असतानाच रोहीत पवार यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहित यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.