#नोकरी : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , Indian Oil ची ही आहे जाहिरात..!

| नवी दिल्ली | इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या भारत सरकारच्या कंपनीने कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक आणि इतर पदांसाठी भर्ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता भारत सरकारच्या कंपनीमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. जर तुम्ही या पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली असेल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकता. अर्ज भरण्याकरता तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे.

नोकरी संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :

रिक्त पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक
रिक्त पदांची संख्या – ५७
योग्यता – अभियंता क्षेत्रात डिप्लोमा, बी.एससी
वय – १८ ते २६ वर्षे
मानधन – २५ हजार – १ लाख ५ हजार दरमहा
स्थळ – पानीपत (हरियाणा)

आवश्यक तारखा :

ऑनलाईन अर्ज सबमिशन सुरू – १२ ऑक्टोबर २०२०
अंतिम तारीख – ७ नोव्हेंबर २०२०
लेखी परीक्षा – २९ नोव्हेंबर २०२०

कसं कराल अप्लाय :

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी निघालेल्या भर्तीसाठी तुम्हाला कंपनीच्या https://www.iocl.com या https://www.iocrefrecruit.in/ संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर भर्ती संबंधी आणि ऑनलाईन अर्जासंबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *