
| नागपूर | रामटेक तालुक्याअंतर्गत येणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनेवानी येथे कार्यरत सहाय्यक शिक्षिका सपना प्रशांत वासे यांनी ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना शाळेचा लळा लागावा त्याअनुषंगाने शाळा बोलकी असावी, त्यातुन शिकण्याची प्रक्रिया सहजपणे व्हावी आणि मुलांच्या दैनंदिन हजेरीत वाढ व्हावी या उद्देशाने कर्ज घेऊन संपुर्ण शाळेची रंगरंगोटी केली.
खरतर जिप शाळांना अनुदान हे शाळेच्या पटसंख्येनुसार मिळत असते. ग्रामीण व आदीवासी भागातील जिप शाळांची पटसंख्या ही गावच्या लोकसंख्येवर आधारीत असताना मिळणारे अनुदान आणि कामाचा पसारा ह्यात बर्याच गोष्टी शाळेसाठी करणे शक्य होत नाही. ह्या गोष्टीचा सारासार विचार करून आणि कोणाकडूनही आर्थीक मदतीचा विचार न करता ५० हजारांचे कर्ज घेऊन शाळेची एका आठवड्यात खुप सुंदर आणि आकर्षक रंगरंगोटी पुर्ण केली.
त्यांच्या ह्या उपक्रमाने शाळेचा चेहरामोहरा बदललेला असून जुनेवानी ची शाळा आकर्षणाचे केंद्र बनलेली आहे. सपना वासे मॅडम यांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत असून जिप सदस्या शांताताई कुंभरे , पंस रामटेक गटशिक्षणाधिकारी संगिता तभाणे आणि इतर पदाधिकारी न अधिकारी यांनी विशेष दखल या उपक्रमाची घेतलेली आहे.
सपना वासे ह्या नेहमी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतात. शैक्षणिक उपक्रमासह सामाजिक उपक्रमातही त्यात अग्रणी असुन या अगोदरही मरणोत्तर देहदानाचा संकल्प त्यांनी केलेला आहे हे विशेष.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री