निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्टने जपले सामाजिक भान..! कैनाड लोहारपाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..!

| पालघर | ०९ ऑक्टोबर २०२० रोजी श्री. निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने कैनाड लोहारपाडा परिसरातील १३८ गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि कपड्यांची मदत देऊन समाजसेवेचाअलौकिक पाया घालण्यात आला.

कोविड-19 मुळे जगभर पसरलेल्या महामारीला आळा घालण्यासाठी लाॅकडाउन सुरू झाले आणि कित्येक रोजगार उपलब्ध करून देणारी साधनं अचानक थांबली. परिणामी मोलमजुरी व रोजंदारीवर काम करुन पोटाची खळगी भरणाऱ्या हातांना काम नसल्याने या काळात चक्क उपासमारीला सामोरे जावे लागले.याच परिस्थितीची माहिती कैनाड लोहारपाडा शाळेतील श्री. संभाजी पौळ व श्री. दत्तात्रेय डोंगरकर या दोन्ही शिक्षकांनी श्री.निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांना भ्रमणध्वनीवर कळवून गरजूंना शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन केल्यावर तत्काळ संबंधितांनी मदत करण्याचे खात्रीशीर आश्वासन देऊन साहित्य वाटप कार्यक्रमाची तारीख देखील दिली.

सदर कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी गरजू कुटुंबांना मदत मिळावी यासाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य केले. श्री. निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने लोहारपाड्यातील १३८ कुटुंबांना प्रत्येकी धान्य व खाद्यपदार्थांसह विविध २१ जिवनावश्यक वस्तूंची एक कीट, दोन टाॅवेल आणि महिलांना ड्रेस या पद्धतीने मदतीचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी सौ. दमयंतीबेन तन्ना (अध्यक्ष तन्ना ट्रस्ट) आणि त्यांच्या सहकारी सौ. बीजलबेन, सौ.मिताबेन, सौ.कांताबेन तसेच ट्रस्टचे श्री. महेशभाई कारिया, श्री पांचाळ सर, कैनाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. शांताराम डोंगरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रामा वळवी, समाजसेवक श्री. सतिश शेळके सर, श्री. दत्तात्रेय डोंगरकर सर, श्री. संभाजी पौळ सर आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

✓ “हालाखीच्या परिस्थितीत निमेश तन्ना ट्रस्टने केलेली मदत म्हणजे लोकांसाठी जीवनदानंच आहे”.
– शांताराम डोंगरकर, उपसरपंच- कैनाड ग्रामपंचायत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *