नौरोसजी वाडिया महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय एकता दौड ला उत्स्फूर्त प्रतिसाद..

| पुणे | युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी उद्घोषित केल्यानुसार भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंती निमित्त नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ मार्फत राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी आभासी राष्ट्रीय एकता दौड रविवार दि ०१ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये आपल्या स्वतःच्या ठिकाणी दि ०१ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे ०४. ०० वाजले पासून रात्री ०८. ०० वाजेपर्यंत आपल्या सोयीनुसार आपण ०३ किमी, ०५ किमी, १० किमी २१ किमी किंवा ४२ किमी अंतर धाऊन / चालून / जॉग करून / सायकल द्वारे पूर्ण करू करणे अपेक्षित अंतर पूर्ण केले.

या राष्ट्रीय एकता दौड मध्ये राज्याच्या विविध भागामधून स्थानिक रुंनर्स, सायकलिंग व जॉगर्स ग्रुप तसेच विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, विविध आस्थपनातील अधिकारी , महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदविला तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले अशी माहिती महाविद्यालयातील राष्ट्रीय देवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सोमनाथ वाघमारे यांनी दिली. राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यासाठी मॉडर्न एजुकेशन सोसायटीचे सर्व विश्वस्थ, नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रवीण भदाणे, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रा नीरज भगत तसेच महाविद्यालयांतील इतर पदाधिकारी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *