नवीनच : खाजगी रेल्वे चालक ठरवणार कोणता थांबा घ्यायचा ते..!

| नवी दिल्ली | खाजगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्टेशनवर रेल्वे थांबवण्याचे स्वांतंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. देशात १५० खाजगी रेल्वे गाड्या देशभरातील १०९ मार्गांवर चालवण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी खासगी ऑपरेटर्सना प्रवासाआधी रेल्वेमार्गावरील थांब्यांची यादी सादर करावी लागणार आहे.

खाजगी रेल्वे चालकांना रेल्वे स्थानकांवर थांबण्याची वेळ आणि निघण्याची वेळही सांगावी लागणार आहे. किमान वर्षभरासाठीचं प्लॅनिंग रेल्वे प्रशासनाला द्यावं लागणार आहे. तशा प्रकारचा अहवाल खाजगी रेल्वे गाड्यांना सादर करावा लागणार आहे. सवलतीच्या कराराच्या अटी व शर्तींच्या अनुषंगाने थांबे/थांब्यांचे निर्णय घेण्यास खाजगी रेल्वे प्रशासनाला स्वातंत्र्य देण्यात आले आहे. रेल्वेने अर्ज-पूर्व बैठकीस उपस्थित असलेल्या एका खाजगी रेल्वे प्रतिनिधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

अटी आणि शर्थी :

✓ रेल्वे गाडीतील वातानुकूलित डबे हे मेक इन इंडिया असले पाहिजे.
✓ रेल्वे 35 वर्षांसाठी हा प्रोजेक्ट खाजगी कंपन्यांना देईल.
✓ रेल्वे विभागाकडून या प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी ड्रायव्हर आणि गार्ड देण्यात येतील.
✓ इतर सर्व व्यवस्था खाजगी कंपन्यांना करावी लागेल. यामध्ये रेल्वे इंजिन देखभाल, दुरुस्ती यांचा समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *