नाविन्यपूर्ण : आता शिक्षकांना ऑनलाईन ध्यान साधनेचे प्रशिक्षण..!

| पुणे | उत्तम आरोग्यासाठी मन शांत व संतुलित राहणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शिक्षक व अधिकारी वर्गासाठी येत्या २४ व २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन ध्यान साधनेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग व इगतपुरीचे विपश्‍यना विशोधन केंद्र यांच्या वतीने मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधना वर्ग हा उपक्रम राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सुरू करण्याबाबत २७ जानेवारी २०१२ च्या शासन निर्णयानुसार आदेशित केले आहे. हा उपक्रम इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीसाठी उपयुक्‍त ठरला आहे. उपक्रम राबवित असताना येणाऱ्या अडचणीही दूर करण्यात येत आहेत.

कोरोना काळात विद्यार्थी भय व तणाव अशा अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत. मानसिक स्थितीचा सामना करण्यासाठी व मनोबल प्राप्त करण्यासाठी या साधनेचा लाभ विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांना टप्प्या टप्प्याने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७ ते ९ या कालावधीत प्रशिक्षण मिळणार आहे. घरातून प्रशिक्षणात सहभागी होणार असाल तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही प्रशिक्षणात सहभागी होता येणार आहे. यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची नोंदणी करणे आवश्‍यक नाही, अशा असे शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *