नवल : मानवाच्या मेंदूची कृत्रिमरीत्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी चीप बसविण्याबाबतचे संसोधन प्रगतीपथावर

| नवी दिल्ली | तंत्रज्ञानातील वाढत्या वापरामुळे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याच संबंधाने मानवी मेंदूशी निगडीत असलेल्या आजारांमधून रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी ही एक नवीन टेक्नोलॉजी विकसित करत आहे. या न्युरालिंकने एक डुक्कर सर्वांसमोर आणले. या डुक्कराच्या मेंदूमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून छोटया नाण्याच्या आकाराची कॉम्प्युटर चीप बसवलेली होती.

चीप इम्प्लान्ट तंत्रज्ञान हे मानवी आजार बरे करण्याच्या लक्ष्याच्या दिशेने एक प्रारंभीचे पाऊल आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये २०१६ साली मस्क यांनी न्युरालिंकची स्थापना केली. चीपच्या माध्यमातून मानवी मेंदूमध्ये वायरलेस कॉम्प्युटर बसवण्याचा न्युरालिंकचा उद्देश आहे. स्पायनल कॉर्डच्या दुखापती, डिमेंशिया, अल्झायमर या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करणे हे न्युरालिंकचे लक्ष्य आहे.

ही चीप म्हणजे मानवी शरीरातील एक प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता असेल. वेबकास्टमध्ये बोलताना मस्क यांनी स्मृतिभ्रंश, नैराश्य आणि इंसोमेनिया या आजारांचा उल्लेख केला. इम्प्लांटेबल उपकरणांमुळे वास्तवात या समस्यांचे निराकरण होऊ शकते असे मस्क म्हणाले. पैसा जमवणे हा आमचा हेतू नाही. महान व्यक्तींनी न्युरालिंकमध्ये येऊन काम करावे, यासाठी प्रयत्न करत आहोत असे मस्क म्हणाले. इलॉक मस्क हे सतत नावीन्याचा शोध घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिकवर चालणा-या वाहनांची निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते. त्याशिवाय स्पेसएक्सच्या माध्यमातून त्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. वाहतुकीचा वेगवान पर्याय देणारे हायपरलूप तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केले आहे. अमेरिकेत हायपरपूलच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. हायपरलूपमुळे काही मिनिटात एका शहरातून दुस-या शहरात पोहोचता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *