नोव्हेंबर महिन्यात बँका राहणार १५ दिवस बंद..!

| मुंबई | ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबरमध्येही जास्त सुट्या असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी लक्ष्मीपुजन आणि त्यानंतर गुरु नानक जयंती यामुळे अनेक दिवस सुट्टी असणार आहे.

आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, संपूर्ण देशात या वेळी बँकांना १५ दिवसांची सुट्टी असेल. ही सुट्टी राजपत्रित, रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि स्थानिक सुटींमुळे असणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या मते, असेही होऊ शकते की, एखाद्या राज्यात बँका बंद असतील आणि त्याचवेळी इतरत्र उघडया असू शकतात. तथापि, आपण सुट्टीच्या दिवसांतही मोबाइल बँकिंग, नेटबँकिंग, यूपीआय आणि एटीएमद्वारे बँकिंग व्यवहार करू शकता. या सेवांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. तथापि, चेक क्लिअरिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *