| मुंबई | कोरोना व्हायरसबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत असते. आता संशोधकांनी काही मोठे खुलासे केले आहेत. नोट, फोन स्क्रीनवर कोरोना व्हायरस 28 दिवस जिवंत राहू शकतो, असा दावा ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजन्सीच्या संशोधनात करण्यात आला आहे. संशोधकांनी तीन वेगवेगळ्या तापमानात अंधारात कोरोना व्हायरसच्या अस्तित्वाची चाचणी केली. ज्याने हे सिद्ध झाले आहे की तापमान जास्त गरम झाल्यास कोरोना व्हायरसचं अस्तित्व कमी होतं.
शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, 20 डिग्री सेल्सियस (68 डिग्री फॉरेनहाइट) तापमानात फोन स्क्रीनवर गुळगुळीत पृष्ठभागावर कोरोना व्हायरस अधिक सक्षम झाला. काच, स्टील, प्लास्टिक, नोटांवर कोरोना व्हायरस 28 दिवस जगू शकेल, असा दावा त्यांनी केला. याव्यतिरिक्त, 30 डिग्री सेल्सियस (86 डिग्री फॉरेनहाईट) पर्यंत जगण्याचा त्यांचा वेळ कमी होऊन सात दिवसांवर आला आहे. 40 डिग्री सेल्सियस (104 डिग्री फॉरेनहाईट) पर्यंत असताना, कोरोना व्हायरस केवळ 24 तास जगू शकेल.
संशोधकांचं असंही म्हणणं आहे की, छिद्रांच्या पृष्ठभागावर जसं की कापसावर सर्वात कमी तापमानात कोरोना व्हायरस 14 दिवस जिवंत राहू शकतो. उच्चतम तापमानात 16 तासांपर्यंत व्हायरसचं टीकणे शक्य आहे. ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर डिसीज प्रिपेयरडनेसचे संचालक ट्रेवर ड्रीव्ह यांनी सांगितलं की, या संशोधनात वेगवेगळ्या सामग्रीवर चाचणी होण्यापूर्वी व्हायरसचे नमुने काढण्यात आले होते. या दरम्यान अतिसंवेदनशील प्रणालीचा वापर करुन त्यात आढळलं की जिवंत व्हायरसचा अंश संक्रमित होण्यास सक्षम आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .