नुसते ट्विटर वर टिव टिव करून कामे होत नाहीत, त्यासाठी घराबाहेर पडावे लागते ; खा. डॉ शिंदे यांचा आ. राजू पाटील यांना खोचक टोला..!

| डोंबिवली | सध्या कोरोनाच्या संकटात अख्खा देश लढत असताना विरोधी पक्षाकडून सरकारला काही प्रश्नांवरून टार्गेट केले जात आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट असल्याने अनेक प्रकल्पांना ब्रेक लागला आहे तर काही ठिकाणी कामांचा वेग मंदावला आहे. काम करणारे मजूर देखील आपल्या मूळ गावी परतल्याने अनेक रस्त्यांच्या सह विकासाची कामे रखडली आहेत. त्या मुळे महत्वाच्या कल्याण शीळ रोड वर होणाऱ्या ट्रॅफिक मुळे मनसेचे आमदार स्थानिक प्रशासनावर टीका करत आहेत. त्यांच्या ट्विटर वरील टिव टिवला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कल्याणला नवी मुंबईला जोडणाऱ्या कल्याण शीळ रोड वरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. लोकल ट्रेन बंद असल्याने आणि मुंबई, ठाण्याला जाणारे अधिकाधिक चाकरमानी डोंबिवली कल्याण परिसरात राहत असल्याने सर्वांना रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आधीच ओसंडून वाहत असणारा कल्याण शीळ रस्त्यावर अजुन ट्रॅफिक जॅम होत आहेत. दरम्यान, रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यात कोसळणारा मुसळधार पाऊस, रस्त्यावर असणारी वाहतूक या मुळे खडे पडणे साहजिक असेच आहे. ते खड्डे देखील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचेप्रमाणे एमएसआरडीसी कडून पेव्हर ब्लॉक टाकून युद्ध पातळीवर दुरुस्त केले जात आहे.

काय म्हणाले होते राजू पाटील :

ठाण्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीतही फेरफटका मारावा म्हणजे इथल्या रस्त्यावरचे खड्डे भरले जातील असा खोचक टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मारला होता.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आमदारांना फेरफटका वरून खोचक टोला :

नुसती ट्विटर वर ट्विट करून प्रश्न मांडायचा आणि तिथेच फॉलो अप करायचे, हेच काम मनसेचे आमदार करत आहेत. मी स्वतः माझ्या मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात घराबाहेर पडून सातत्याने कोरोना सह इतर प्रश्नांवर कार्यरत आहे. तुम्ही आधी स्वतःच्या घरातून बाहेर तर पडा, पाहणी करा आणि मग बोला असा खोचक सल्ला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.

https://twitter.com/thelokshakti/status/1298615618585767936?s=19

दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आपल्या घराबाहेर येऊन फेरफटका मारल्यानंतर त्यांचे आभार मानताना आमदार राजू पाटील यांना उद्देशून कोण फुल टाईम मतदारसंघात आणि कोण पार्ट टाईम मतदारसंघात काम करतात हे सुजाण नागरिक जाणतातच, असा सणसणीत टोला देखील खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला आहे. आता पर्यंत रस्त्यावर येऊन काम केले नाही, इथून पुढे तरी करा, त्यासाठी शुभेच्छा देतो, अश्या खोचक शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

https://twitter.com/thelokshakti/status/1298616131293286401?s=19

Leave a Reply

Your email address will not be published.