पक्षात बदल करण्याची तीव्र मागणी, अनेकांचे सोनिया गांधींना पत्र..! आज पक्षाची बैठक..

| नवी दिल्ली | काँग्रेसमधील तरुण नेते सध्या बंडखोरी करताना दिसत आहेत. दरम्यान पक्षात बदल करण्याची मागणी तीव्र झाली आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कॉंग्रेसच्या २३ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली आहे. ज्यांनी हे पत्र लिहिले त्यांच्यात ५ माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार आणि अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांचा यांचा समावेश आहे. या मुद्दय़ावरून सोमवारी सकाळी ११ वाजता कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आहे.

पत्रात काय आहे?
भाजप सातत्याने पुढे जात असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत तरुणांनी नरेंद्र मोदींना जोरदार मतदान केले. कॉंग्रेसचा बेस कमी असल्यामुळे आणि तरुणांचा आत्मविश्वास तुटत असल्याबद्दल गंभीर चिंता यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की सुमारे १५ दिवसांपूर्वी पाठविलेल्या या पत्राने बदलाचा असा अजेंडा दिला आहे, ज्यांची चर्चा सध्याच्या नेतृत्वाला खुपू शकते.

या ३ मागण्यांचा उल्लेख

✓ लीडरशिप फुल टाइम आणि प्रभावी असावी, जी फिल्डमध्ये अॅक्टिव्ह असेल. त्याचा परिणामही दिसावा.
✓ काँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक घ्यावी.
✓ संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीने तयार करावी जेणेकरून पक्षाला नवजीवन मिळण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.

उद्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या महिन्यात आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. गेल्या वर्षी राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. कॉंग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) सोमवारी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. यात नेतृत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *