पेट्रोल ची नव्वदी..! भाजप खासदाराचाच मोदी सरकारला घरचा आहेर..!

| मुंबई | मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. सरकारी कंपन्यांनी तेलाचे भाव वाढवल्याने पेट्रोल (petrol ) आणि डिझेलचे (diesel ) भाव २८ आणि ३० पैशांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव ५० डॉलर प्रति बॅरल झाला आहे. तसेच गेल्या महिन्यातही कच्चा तेलाचे दर वाढले होते.

कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्याने महाराष्ट्राला मोटा फटका बसला आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव २७ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुंबईसह विविध भागात पेट्रोल ९०.०५ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेलचे भाव ३० पैशांनी वाढला असल्यामुळे ८०.२३ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पेट्रोल ४० रुपये लिटरनेच विकायला हवे, भाजप नेत्याने व्यक्त केले मत :

केंद्रीय भाजप सरकारच्या काळात पेट्रोलने उच्चांग गाठला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त आहे. पेट्रोल प्रति लीटर ४० रुप भावाने विकायला हवे असे भाजपा नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात मुंबईमध्ये ९०.०५ रुपये प्रति लीटर पेट्रोल तर डिझेल ८०.२३ रुपये आहे. ठाणे पेट्रोल ९०.३९ रुपये तर डिझेल ८०.५६ रुपये, पुणे पेट्रोल ९०.०० तर डिझेल ७८.९७ रुपये, नाशिक ९०.७६ रुपये तर डिझेल ७९.७१, नागपूर ९०.१८ तर डिझेल ७९.७८ रुपये प्रति लीटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस उच्चांक गाठताना दिसत आहे.
(petrol has crossed 90)

Leave a Reply

Your email address will not be published.