| मुंबई | पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून मदत करण्यात आली.
कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. या खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या तसेच नातेवाईक उपस्थित नसलेल्या पत्रकार बांधवांचे चेक पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधी कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार स्व.जयंत करजवकर , News 18 लोकमतच्या मुंबई कार्यालयात काम करणारे पत्रकार स्व.विठ्ठल मांजरेकर , तसेच संभाजीनगर येथील सामनाचे पत्रकार स्व. राहुल डोलारे यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली.
यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे, उपाध्यक्ष श्री दीपक भातुसे, माजी कार्यवाह श्री प्रमोद डोईफोडे, श्री सोनू श्रीवास्तव तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी श्री मयुरेश गणपते, श्री राजू सोनवणे आदि उपस्थित होते.तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे हे देखील उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .