पत्री पूलाला या शिवसेनेच्या नेत्याचे नाव द्या, काँग्रेसची मागणी

| कल्याण | गेल्या २ वर्षांपासून कल्याणच्या पत्रीपुलाच्या बांधणीचे काम सुरु असून अद्यापही ते पूर्ण झालेले नसताना या पुलाचे काम पूर्ण होताच या पत्रीपुलाला माजी कामगारमंत्री साबीर शेख यांचे नाव देण्याची कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कल्याण शहर हे ऐतिहासिक शहर असून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. कल्याण शहरात अनेक नामवंत, विचारवंत व राजकीय व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी कल्याणचे नाव सातासमुद्रापार गाजविले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणताही जातीभेद न करता सर्व धर्म समभाव करून, सर्व धर्मीयांना एकत्र केले व स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन, महाराष्ट्राचे माजी कामगारमंत्री शिवभक्त साबिर शेख यांचे काम कल्याण शहरासाठी उल्लेखनीय होते.

त्यांचा लोकांमध्ये असलेला संपर्क, जनतेविषयी असलेली तळमळ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदराची भावना पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अंबरनाथचे आमदारकीचे तिकीट दिले व ते अंबरनाथ तालुक्यातून ३ वेळा आमदार म्हणून प्रचंड मतांनी निवडूनदेखील आले. तसचे साबीर शेख यांच्या चांगल्या कामाची दखल घेवून, त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कामगारमंत्री पदाची जबाबदारी दिली. साबीर शेख यांनी कल्याण शहरासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन कल्याण-डोंबिवली शहराला जोडणाऱ्या पत्रीपुलाला साबीर शेख यांचे नाव देण्यातची मागणी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *