
| इंदापूर / महादेव बंडगर | प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तक्रारवाडी अंतर्गत ग्रामपंचायत पोंधवडी च्या वतीने गावामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात मा. सरपंच नानासाहेब बंडगर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी थर्मल गण , पल्स ऑक्सिमिटर च्या साह्याने नागरिकांची तपासणी केली. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डाॅ खारतोडे, मा .उपसरपंच दत्तात्रय पवार , संजय भोसले, डाॅ. मृदुला जगताप, शरद ससाणे, उषा यादव, आशा अनिता काशिद व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी मधील शिक्षक यांच्या साह्याने करण्यात येत असल्याची माहिती डाॅ. मृदुला जगताप यांनी दिली.
दोन दिवसांमध्ये 16 जणांच्या साह्याने पोंधवडी गावातील सर्व ग्रामस्थांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत पोंधवडी च्या वतीने सॅनीटायझर, ग्लोज , फेसशील्ड, 95 मास्क, पल्स ऑक्सिमिटर, थर्मल गण इत्यादी साहित्य देण्यात आले असल्याची माहिती डाॅ. मृदुला जगताप यांनी दिली.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!