पेन्शन संघटनेने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे दिले स्मरणपत्र..!

| जालना | काल मराठवाडा दौऱ्या दरम्यान जालना येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटने तर्फे महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. संघटनेच्या मुंडन मोर्चा दरम्यान स्वतः मुख्यमंत्री असताना जुनी पेन्शन व फॅमिली पेन्शन संदर्भात दिलेले आश्वासन सर्व कर्मचारी यांच्यासाठी आशादायी आहे हे देखील संघटनेतर्फे सांगण्यात आले.

काल दिलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने २००५ नंतर सेवेत रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी करण्यात आली तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युईटी प्रदान करा. एनपीएसची सक्ती न करता त्याबाबद्दलची संभ्रमावस्था दूर करा तसेच जिल्हाबदली झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कपातीचा एकत्रित हिशेब मिळावा, गेल्या पंधरा वर्षात सेवेत मयत कर्मचाऱ्यांना शासनाने कोणतेही लाभ दिले नाहीत, त्यांच्या कुटुंबाची होत असलेली वाताहात शासनाने त्वरित थांबवून त्यांना योग्य न्याय द्यावा, तसेच कोविड 19 काळात कोविड सेवा बजावताना एखादा कर्मचारी दुर्दैवाने मयत झाल्यास त्याच्या कुटुंबास शासनातर्फे त्वरित ५० लक्ष रुपयांची मदत देण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.

त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, यावेळी राज्यप्रसिद्धी प्रमुख संतोष देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *