पिंपरी बु. येथील शिवस्मारक उद्यान विकास कामाचा शुभारंभ..

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यातील पिंपरी बु. येथे प्रस्तावित शिवस्मारक उद्यान व परिसर सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले याचा भूमिपूजन समारंभ दि.10 ऑक्टोबर रोजी मा. बांधकाम व आरोग्य सभापती तथा पुणे जि. प. सदस्य प्रविण माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे तयार होत असलेल्या या उद्यान व परिसराच्या सुशोभिकरणासाठी माने यांच्या फंडातून ८ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, लवकरच हे कार्य पूर्णत्वास जाईल. व शिवरायांच्या नावे होणाऱ्या या कामाची गुणवत्ता व दर्जा याबाबत आपण जातीने पाहणी करणार असल्याचे माने यांनी यावेळी प्रतिपादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्फुर्तीचा अखंड झरा असून, त्यांच्या नावे होत असणारे हे कामही माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी प्रविण माने यांनी व्यक्त केले.

या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने सुरेश शिंदे सर,दत्तात्रय घोगरे,उमेश शिंदे, श्रीकांत बोडके, बालाजी बोडके ,नागेश गायकवाड, सुनील बोडके, समाधान बोडके, भागवत सुतार, हरीभाऊ सुतार, निलेश बोडके, संदीप बोडके, दादाभाई शेख, सुदर्शन बोडके, राहुल शिंदे, दत्तूनाना बोडके, श्रीकांत घोडकर, हनुमंत सुतार, काका बोडके, अक्षय बोडके, दादा घाडगे, प्रणित बोडके, अतुल लावंड, विवेक बोडके, निलेश तात्या बोडके, वर्धमान बोडके, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.