पिपल कार्ड हे गुगलचे भन्नाट फीचर ; तयार करा तुमचे visiting कार्ड..!

| मुंबई | Google ने आपल्या युजर्ससाठी भारतात खास ‘people cards’ सर्व्हिस सुरू केली आहे. या फीचरमुळे युजर्सना गुगल सर्चमध्ये व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड बनवता येईल. व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्डद्वारे युजर गुगल सर्चमध्ये आपली वेबसाइट, सोशल मीडिया हँडल आणि अन्य माहिती शेअर करु शकतात. ही सर्व्हिस गुगलच्या Knowledge Graph चा वापर करुन युजरने दिलेली माहिती डिस्प्ले करते. सेवेचा वापर करण्यासाठी युजरला मोबाइल नंबर द्यावा लागतो. गुगल सर्चवर people card बनवण्यासाठी युजरचं गुगल अकाउंट असणं गरजेचे आहे.

कंपनीची ही सेवा सध्या मोबाइल युजर्ससाठीच आहे. म्हणजे तुम्हाला पब्लिक प्रोफाइल बनवण्यासाठी मोबाइलवरुन गुगल अकाउंट लॉग-इन करावं लागेल. सध्या ही सेवा केवळ इंग्रजीतच उपलब्ध आहे. या सेवेद्वारे लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असं गुगलने म्हटलं आहे. या सेवेमुळे चुकीचा किंवा फेक युजर , भाषा आणि लो-क्वॉलिटी कॉन्टेंट ओळखण्यास मदत होईल. तसेच, गुगलच्या पॉलिसीचं उल्लंघन करणाऱ्या कॉन्टेंटवरही लगाम लागेल, असं कंपनीने म्हटलं. people card चा गैरवापर होऊ नये यासाठी एक अकाउंटद्वारे एकच पिपल कार्ड बनवता येतं.

people card असे बनवावे :

तुमचं ‘पिपल कार्ड’ बनवण्यासाठी सर्वात आधी गुगल अकाउंटमध्ये साइन-इन करा. यानंतर, ‘add me to search’ सर्च करा. नंतर तुम्हाला ‘add yourself to google search’ हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला फोन नंबर विचारला जाईल. या नंबरची ६ अंकांच्या कोडद्वारे पडताळणी केल्यानंतर गुगलकडून आलेला एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला पब्लिक प्रोफाइल बनवण्यासाठी तुमचं काम, शिक्षण आणि अन्य अनेक आवश्यक माहिती द्यावी लागते. एकंदरीत, हे गुगलचे पीपल कार्ड visiting card म्हणून अधिकचे उपयोगात येईल, अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *