| प्राचीन वारसा संवर्धन | अंबरनाथच्या १ हजार वर्षांच्या प्राचीन वारसाला मिळणार नवी झळाळी, खा. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे शिवमंदिर सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून ४३ कोटींचा निधी मंजूर…

| ठाणे | ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी आज 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज दिली. शिवमंदिराचा विकास आराखडा मंजूर करून घेण्यापासून ते निधी मिळवण्यापर्यंत घेतलेल्या सर्व परिश्रमाला आज यश आल्याबद्दल डॉ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले. सोबतच शिवमंदिराच्या विकासासाठी विशेष योगदान देणाऱ्या अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वालेकर , आमदार डॉ बालाजी किणीकर , सुनील चौधरी यांच्यासाहित सर्व शिवसैनिक आणि अंबरनाथकरांचे जाहीर आभार व्यक्त केले.

2014 साली प्रथमच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाकडे अखंड आणि अविरत पाठपुरावा सुरू ठेवला. दरम्यान एकीकडे विकासनिधी आणण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षांपूर्वी अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हल सुरू केला.जागतिक किर्तीच्या गायक आणि संगीतकारांनी या फेस्टिव्हलला उपस्थिती दर्शवत इथल्या साचेबद्ध नियोजनाचे कौतुक केले. विद्यमान मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांनीही अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हलला आपली उपस्थिती दर्शविली होती. अंबरनाथच्या शिवमंदिर आणि परिसराचा झालेला कायापालट पाहून मुख्यमंत्री महोदयांनी आश्चर्य व्यक्त केले होते. याबद्दल श्री उद्धवजी ठाकरे यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि टीमचे जाहीर अभिनंदन केले होते.

आंगणेवाडी यात्रेवेळेच्या भाषणात देखील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काढेल होते गौरवोद्गार

चालू 2020 वर्षी फेब्रुवारी महिन्यात, कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेत देखील राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी अंबरनाथ फेस्टिव्हलचा उल्लेख केला होता. एखाद्या तीर्थक्षेत्राचा विकास करायचा असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधीने मनावर घेतलं पाहिजे आणि त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना आपण एकदा फोनवर अंबरनाथच्या शिवमंदिराच्या संदर्भात सूचना केल्या आणि वर्षभरात डॉ श्रीकांतने या परिसराचा कायापालट केला. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदारसंघातील तिर्थक्षेत्राचा विकास अंबरनाथ येथील शिवमंदिराच्या धर्तीवर करायला हवा असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी काढले होते.

कसा असेल विकास आराखडा?कसा होणार निधी खर्च?

दरम्यान, अंबरनाथ शिवमंदिराचा विकास 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये खर्च होणार असून दुसऱ्या टप्प्यात 23 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

टप्पा 1 मध्ये 3 भागात कसे काम होणार?.

टप्पा 1) भाग 1) यात आरक्षण क्रमांक 171 मधील जागेत प्रवेशद्वार व कमान उभारण्यात येणार आहे. तसेच बस स्टॉप विकसित करण्यात येणार असून जंतर-मंतर पार्क व दर्शनी भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याच ठिकाणी भव्य अशा पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी सुरुवातीला नऊ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

टप्पा 1) भाग 2)
यामध्ये दुसऱ्या भागात वालधुनी नदीचे संवर्धन करण्यात येणार आहे. तसेच अंबरनाथ शहराच्या बाजूने मंदिराकडे जाणारे व येणारे दोन नवीन टेनसाईल सस्पेंडेड ब्रिज उभारण्यात येणार आहेत. यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

टप्पा 1) भाग 3)
टप्पा एक मध्येच तिसऱ्या भागात आरक्षण क्रमांक 172 जागेत असणाऱ्या पुर्वीपासूनच अस्तित्वातील प्राचीन कुंडाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. तसेच सध्याच्या पडीक उपहारगृहाचे पॅव्हेलियनमध्ये नूतनीकरण करणे तसेच अँफी थिएटर व संलग्न विद्युत व्यवस्था उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पूर्वीपासून अस्तित्वातील असलेल्या वसाहतीच्या बाजूला रिटेनिंग वॉल बांधण्यात येणार असून त्याच ठिकाणी फुल मार्केट उभारण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी आठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार..

टप्पा 2 मध्ये काय विकास केला जाणार??

टप्पा 2 मध्येही एकूण 3 भागात निधी खर्च करण्यात येणार आहे.

टप्पा 2) भाग 1)

यामध्ये आरक्षण क्रमांक 169 मधील जागेत पूर्वीपासून अस्तित्वातील असलेले खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार आहे. तसेच टेनसाईल रूफ उभारण्यात येणार आहे. यातच दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या शिवमंदिर महोत्सवासाठी पायाभूत विकासकामे जसे की, मत्स्यालय व फार्मर्स प्लाझा देखील उभारण्यात येणार आहे. यासाठी साडे आठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

टप्पा2) भाग 2)

टप्पा क्रमांक दोन मधील दुसऱ्या भागात आरक्षण क्रमांक 173 च्या जागेत प्रदर्शन मैदान उभारण्यात येणार आहे. यानंतर या परिसरात सिमेंट कॉंक्रीट रस्ता तयार करण्यासाठी आणि संग्रहालय उभारण्यासाठी पाच कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात येणार आहे.

टप्पा 2)भाग3)

टप्पा क्रमांक दोन मधील तिसऱ्या भागात आरक्षण क्रमांक 174 च्या जागेत येणार वालधुनी नदीचा किनारा विकसित करण्यात येणार आहे. किनारा संवर्धन सोबतच या ठिकाणी असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या पौरानिक अवशेषांचे प्रदर्शन क्षेत्र निर्माण करण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या विकास आराखडयानुसार अंतिम टप्प्यात वालधुनी नदीच्या किनारी सर्व भाविकांसाठी विरंगुळा घाट बांधण्यात येणार आहे.

यानुसार दुसऱ्या टप्प्यात एकूण 23 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. टप्पा 1 मध्ये 20 कोटी व टप्पा 2 मध्ये 23 कोटी असे मिळून एकूण 43 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *