प्रतिष्ठित किनो शिक्षा गौरव पुरस्कार जाहीर, राज्यस्तरीय पुरस्कार नगरच्या नारायण मंगलारम यांना तर दिंडोरीचे गुलाब दातीर देखील सन्मानित..!

| नाशिक | मालेगाव येथील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी राज्य तसेच जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना किनो शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाचे किनो शिक्षा गौरव पुरस्कार देखील शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहेत. ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्या अनुषंगाने शिक्षकांबद्दल प्रेम, आदर , कृतज्ञता व्यक्त केली जाते. शिक्षकाप्रंती असणाऱ्या आदरापोटी किनो संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, दिंडोरीतील प्रयोगशील शिक्षक गुलाब दातीर यांना तो जाहीर झाला आहे.

यंदा राज्यस्तरीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडी येथील शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम यांना जाहीर झाला, असल्याची माहिती संस्थेचे सचिव रईस शेख यांनी दिली. दरम्यान नुकताच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.

या राज्यस्तरीय पुरस्कारासह जिल्ह्यातील १८ तर अहमदनगर, अमरावती, धुळे, ठाणे, पुणे या जिल्ह्यातील प्रत्येकी एक अश्या पाच शिक्षकांना जिल्ह्यास्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. शेकडो शिक्षकांनी आपले प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने पाठवले. याचे संस्थेच्या समितीद्वारे परीक्षण करण्यात येऊन पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सदर पुरस्काराचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच होणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षक

• मालेगाव – गणेश क्षीरसागर, किरण जिभाऊ शेवाळे, अर्चना आहिरे, वैजनाथ भारती, विजया भदाणे
• नाशिक – मेघना आहिरे
• चांदवड – संध्या देवरे, काशीनाथ आहिरे
• सिन्नर – पांडुरंग भोर
• बागलाण – सतीश निकम
• कळवण – भरत जाधव
• सुरगाणा: रमेश जाधव
• दिंडोरी – गुलाब दातीर, अनुराधा तारगे
• त्र्यंबकेश्वर – जयेशकुमार कापडणीस
• इगतपुरी – अतुल आहिरे
• निफाड – पांडुरंग देवरे
• येवला – अनिल महाजन
• अहमदनगर – संजना चेमटे
• अमरावती – देविदास राठोड
• धुळे – सुनील मोरे
• ठाणे – महेंद्र पानसरे
• पुणे – सुनीता काटम

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *