परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर..!

| अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा, महाविद्यालयात प्रथमच यावर्षीचा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांशिवाय साजरा करण्यात आला. पर्यायाने शालेय स्तरावर होणारे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले नाहीत. त्यामुळे अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने गावातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वातंत्र्य दिन, महापुरुष, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, कोरोना जागृती, स्त्री भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, माहिती तंत्रज्ञान, मोबाईल शाप की वरदान, जलसंवर्धन काळाची गरज, लॉक डाऊनमुळे जगणं समजू लागलंय, आदर्श तरूणाई इ विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार परखडपणे मांडले.

दरम्यान, सदरील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अनिल टकले, कुशाबा साळुंके, विठ्ठल शिंदे यांनी काम पाहिले. यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना गुणगौरव कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ अनारसे यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वीतेसाठी परिवर्तन प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी : 

✓ बाल गट : १) देवांग अमित देशमुख २) प्रगती गणेश अनारसे ३)अनुष्का आप्पा अनारसे, सोहम तुळशीराम गदादे ४) हरीष देविदास बरकडे ५) हर्ष विजय अनारसे
✓ लहान गट : १) सार्थक अंकुश सुरवसे २) सार्थक संतोष अनारसे.
✓ किशोर गट : १) प्रतिक्षा दत्तात्रय अनारसे २) वैष्णवी अविनाश घोडके ३) आदिती दत्तात्रय अनारसे, अजित रविंद्र अनारसे ४) समर्थ बाळकृष्ण रणशिंग ४) श्रुती दत्तात्रय साळुंके ५) राजनंदिनी राजेंद्र जाधव
✓ कुमार गट : १)प्रियांका विनोद नरसाळे २) सिद्धी दत्तात्रय साळुंके ३) प्रतिक्षा राजेंद्र अनारसे ४) ओम गणेश साळुंके
✓ मोठा गट : १) रिंकू अशोक साळुंके २) हर्षदा विनोद नरसाळे ३) करण रविंद्र अनारसे ४) ऋतुजा सुरेंद्र साळुंके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *