| इंदापूर / महादेव बंडगर | पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार मागील आठवड्यातच दहशतवादविरोधी कक्ष पुणे ग्रामीण यांनी शिरूर येथे मोठी कारवाई केली होती. त्यानंतर पुढील कारवायांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह वालचंदनगर-भिगवण हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे किरण कुसाळकर यांना बातमीदारा द्वारे दोन इसम वालचंदनगर -भिगवण परिसरामध्ये पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली होती.
या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व स्टाफ यांच्या मदतीने मुक्तार अजीज शेख, वय- १९ वर्षे , योगेश कचरू धोत्रे, वय- २१ वर्ष दोघेही राहणार- गोधेगाव तालुका- नेवासा जिल्हा- अहमदनगर यांना येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या दोन्ही आरोपींवर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप वालचंद नगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर , पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार वालचंद नगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष चे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप वालचंद नगर पोलिस स्टेशन, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, विश्वास खरात, राजेश पवार , पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे ,किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंद नगर पोलीस स्टेशन स्टाफ पोलीस हवालदार प्रकाश माने, विशाल निर्मळ, नितीन कळसराइत व विजय शेंडकर पथकाने केली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .