| मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीला मोठा झटका दिला आहे. आरबीआयने एचडीएफसीच्या सर्व डिजिटल सेवांवर निर्बंध घातले आहेत. आरबीआयने 2 डिसेंबर रोजी आदेश जारी करुन इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि पेमेंट यूटिलिटी सर्व्हिसवर बंदी घातली आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी ग्राहकांना नवे क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही बंदी घातली आहे. मागील दोन वर्षात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना डिजिटल सेवांमध्ये अनेक वेळा अडचणी आल्या. त्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे.
मागील दोन वर्षात बँकेसाठी हा तिसरा मोठा झटका आहे.
बँकेकडून स्टॉक एक्स्चेंजला माहिती
आरबीआयने 2 डिसेंबर रोजी सर्व डिजिटल सेवा थांबवण्याचा आदेश दिला आहे, असं बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. आदेशात आरबीआयने सांगितलं आहे की बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेमेंट यूटिलिटीजमध्ये सातत्याने अडचणी येत आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुरु आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत 21 नोव्हेंबर रोजी बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये समस्या आली होती. प्रायमरी डेटा सेंटरमध्ये पॉवर फेल झाल्यामुळे ही अडचण आली होती.”
तात्पुरत्या स्वरुपात डिजिटल बिझनेसची लॉन्चिंग थांबवली
बँकेने डिजिटल बिझनेसशी संबंधित सर्व कार्यक्रमांची लॉन्चिंग तात्पुरत्या स्वरुपात रोखावी, असा सल्ला आरबीआयने दिला आहे. एचडीएफसी बँक आपलं डिजिटल 2.0 लॉन्च करण्याच्या तयारीत होती. ज्यामध्ये बरेच डिजिटल चॅनल लॉन्च होणार होते. परंतु आता आरबीआयने सर्व सेवांवर निर्बंध घातल्याने बँकेला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच इतर सर्व बिझनेस जनरेटिंग आयटी अॅप्लिकेशनही रोखण्यास सांगितले आहे. यामध्ये नव्या क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या सोर्सिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.
आरबीआयकडून चौकशीचे आदेश
आरबीआयने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतरच म्हणजे सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतरच हे निर्बंध हटवले जातील असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .