तो दिवसच जरा वेगळा होता. त्या सकाळी मत्स्योदरी देवीच्या नर्सरीतून अशोका, करंजचे झाडे रिक्षात भरताना आमचा उत्साह झाडांच्या पानासारखा तजेलदार वाटतं होता. एका पर्यावरणाच्या मोहिमेची सुरुवात त्यादिवशी होणार होती. भोलेबाबाच्या गावात पहिल्या झाडाची रुजवण होऊन तालुक्यात त्या झाडाची बीजे पसरणार होती. तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सिद्धेश्ववर पिंपळगावचे गावकरी त्या नवनिर्मितीचं मोठ्या दिलानं स्वागत करण्यासाठी शाळेच्या परिसरात जमले होते. आमच्या गाडीतले झाडं जेवढे टवटवीत दिसत होते; तेवढाच गाडीत बसलेला एक चेहरा तितकाच खुललेला वाटत होता. जणू दीप (दिवा) उजळावा अगदी तसा… त्याच नाव ” संदीप सातपुते…”
तो एका चळवळीने पेटलेला एक दिवा अंबड पासून पिंपळगावपर्यत गावातल्या तरुणांना, शेतकऱ्यांना आणि नोकरदार मित्रांना फोन करून गावात झाडे लावण्यासाठी निमंत्रित करत होता. त्या दिवशी नवनिर्मितीच्या भारावलेल्या या आमच्या मित्राकडे पाहून आम्हीही उत्साहित झालो होतो. ठरलेला कार्यक्रम पार पडला. पण या कामावर समाधान होणार नव्हते; म्हणून संदीपच्या सांगण्यावरून आम्ही गावचे सरपंच जितू भाऊ सातपुते यांना नदी आणि बाजूचे रस्ते करण्यासबंधी कल्पना मांडली. तरुण आणि कार्यक्षम तहसीलदार नरेंद्र देशमुख ही कल्पना ऐकून आनंदी झाले आणि त्यांनी तहसील कार्यालयामार्फत पोकलेन मशीन देण्याचं कबूल केलं; अट एकच होती लोकवर्गणी..! संदीप सरांच्या मनात रुजलेल्या बीजाला अंकुर फुटल्यासारखा झाला होता. तहसीलदार, बी डी ओ, नारायनभाऊ देवकाते, समाजभान आणि गावकरी मंडळी नदीपात्र पाहण्यासाठी भोलेबाबांच्या मंदिराला साक्षी ठेऊन नदीपात्रात उतरले.
मुसा भद्रायणी नदीचं ते विस्तारलेलं पात्र भर पावसाळ्यातही कोरडं ठाक पडलेलं होतं. गावातले लोकं दुष्काळात दोन दोन किलोमीटरवरून प्यायला पाणी आणायचे. नदीकाठावर शेती असूनही शेतात दुष्काळ दिसायचा. नदीचं पात्र म्हणजे बाभळीचं बन झालं होतं. पण त्या नदीपात्रात आम्हाला पर्यटन, बागायती शेती, पोहणारी मुलं, सुशोभीकरण झाल्यानंतर बसण्यासाठी केलेले बेंच दिसत होते. अर्थात त्या स्वप्नांचा पाठलाग संदीप सरांचाच..! गावकरी त्यादिवशी एकत्र आले, पहिल्यांदा पाण्यावर बोलू लागले. आपलं गाव पाणीदार करण्याची इच्छा व्यक्त करू लागले. सर्वांनी आपल्या आपल्या परीने मदत करण्याचं कबूल केलं आणि सुरुवात झाली एका पाणीदार चळवळीला…!
गावातल्या लोकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. प्रत्येकापर्यत पाणी अडवण्याच महत्व पटवून सांगितल्या जाऊ लागलं. संदीप सरांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे यांचे स्वीय साहाय्य कैलास अंडील, गुंजकर साहेब, जाधव साहेब, जलसमितीचे मते बापू, नारायनभाऊ देवकाते, महादेव मते, सखाराम उगले यांनी येऊन लोकजागृती करण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली. गावकरी पेटले होते. त्यात संदीप सरांना खरी ताकत आणि ऊर्जा दिली ती गावचे सरपंच जीतूभाऊ सातपुते यांनी. आणि त्यांच्या जोडीला होते जगू नाना सातपुते आणि गावचे पोलीस पाटील. उपसरपंच सागडे दादांनीही या सगळ्या चळवळीला मोठ्या भावासारखा भक्कम पाठींबा दिला. ह्या गावच्या एकीला जणू भोलेबाबाही प्रसन्न झाले की काय अशी एक आनंदाची घटना या दरम्यान घडली. ती म्हणजे गावातील लोकांचं अनेक दिवसांपासून रखडलेल ऐंशी लाखाच अनुदान याच दरम्यान बँकेत जमा झालं. लोकवर्गणीचा खूप मोठा प्रश्न आता मार्गी लागणार होता. गावातील प्रत्येकाकडून किमान तीनशे रुपये वर्गणी द्यायचं ठरलं होतं. पण गोळा कशी करणार हा मोठा प्रश्न होता. लोकं पैसे द्यायला तयार होते पण जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. शेवटी ही जबाबदारी ही संदीप सरांनीच घेतली.
ध्येय जर पवित्र असेल तर हिम्मत आपोआप मिळत असते आज हिम्मत देणारेही. संदीप सरांनी हिम्मत दाखवली आणि त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ दिली सरपंच जितू भाऊ, जगू नाना, उपसरपंच, पोलीस पाटील आणि गावच्या तरुणांनी. सकाळी उठायचं, डब्बा भारायचा आणि बँकेत लोकवर्गणी जमा करण्यापासून गावच्या नदीवर काम करायची दिनचर्या सुरू झाली. अगदी ऑपरेटरच्या जेवणापासून ते पोकलेनच्या डिझेलची सगळी व्यवस्था लावताना अनेक वेळा घरी यायला उशीर व्हायचा तरी संदीप सरांनी आपल्या ध्येयाशी प्रतारणा केली नाही. गावातले लोकही पूर्ण ताकतीने सहकार्य करत होते. शाळा, स्वतःची शेती आणि नदीखोलीकरण या सगळ्या गोष्टी तारेवरची कसरत करावी अशा पद्धतीने संदीप सरांनी सांभाळल्या होत्या. अनेकवेळा या लढाई त्यांना एकाकी वाटत होतं. पण डोळ्यासमोर असलेलं स्वप्न त्यांना त्या एकटेपणातही धीर देत होत. समस्त महाजन व नारायनभाऊ देवकाते यांच्या मदतीने मोठं पोकलेन आणण्यात सरांना यश आलं. हळूहळू एक एक अडचणी दूर होत होत्या. आजवर पाऊस पडत होता तसा वाहून जात होता. पण उकरलेल्या नदीपत्रात यावेळी पाणी दिसू लागलं. ते पाणी पाहून गावकरी आनंदी झाले होते. अवघ्या एक लाख रुपयांच्या लोकवर्गणी मध्ये मोठे काम पार पडत होते. कमी पैशात जास्त साठवण करण्याची कल्पना यावेळी संदीप सरांनी सरपंचाना बोलून दाखवली; तेही तयार झाले. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या मदतीने नदीवर मातीचे बांध टाकण्यात आले. जुने केटिवेअर प्लास्टिक आणि मुरुमाचा वापर करून अडवण्यात आले. अडवलेल्या प्रत्येक बंधाऱ्यात साठलेल पाणी पाहून शेतकरी खूप आनंदी झाला होता. दोन महिन्यांच्या मेहणतीतून दोन किलोमीटर नदीपात्रात पाण्याचा थेंब ना थेंब अडवण्यात आला. नदीशिवारातल्या विहिरीची पाणी पातळी वाढली. बुजलेले पाण्याचे नळ ओसंडून वाहायला लागले. संदीप सरांनी गावकऱ्याना दाखवलेलं एक स्वप्न बऱ्याच अंशी पूर्ण झालं होतं.
दोन महिन्यांची धडपड, ऊन पाऊस न पाहता केलेली पळापळ, कुटूंबावर झालेलं दुर्लक्ष, झालेला मानसिक त्रास या सगळ्यांच चीज नदीपात्रातल पाणी पाहून वाटत होतं. कसल्याही स्वार्थाशिवाय एवढं झपाटून गावाला पाणीदार करण्यासाठी सातत्याने दोन महिण्यापासून झगडणाऱ्या संदीप सर व त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा..! असा एक संदीप गावात प्रत्येक गावात असावा… जो बघेल स्वप्न प्रत्येकासाठी प्रत्येक माणसांसाठी… पाणीदार आणि माणुसकीदार गावासाठी..!
संदीप सर व त्यांच्या टीमला समाजभानचा मानाचा सलाम..!
– दादासाहेब श्रीकिसन थेटे, समाजभान, जालना
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .