| अमरावती | सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोनाकाळात आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षक भारतीद्वारे सन्मान करण्यात येणार आहे.
वैद्यकिय क्षेत्रातील पाच मान्यवरांना, आपल्या जिवांची पर्वा न करता दुसऱ्यासाठी कोरोनाकाळात मदत पुरविणाऱ्या मदतगारांना, रुग्णाना आरोग्य केद्रांपर्यत पोहचविणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अंगणवाडी सेविकांना, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या बालरक्षकांचा सुद्धा शिक्षक भारतीद्वारे सन्मान करण्यात येणार आहे.
याच सोबत समता समानता याची मुल्ये समाजात रूजावी म्हणून एका राज्यस्तरीय पुरस्काराचे नियोजन करण्याबाबत शिक्षक भारतीकडून निश्चित झाले आहे. पुरस्कार अथवा सन्मान सोहळा ऑनलाईन पध्दतीने होणार असून या करीत अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे आणि त्यांच्या हस्तेच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. याबाबत शेकडो मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेतल्या जाणार असून त्यामधील पाच मान्यवरांची निवड करण्यात येणार आहे.
विनोद राठोड यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा आणि शाळाबाहय मुलांसाठी बालरक्षक म्हणून केलेल्या उल्लेखनिय कामाची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार जाहिर झाला असून त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्रदान करणार आहे. ३ जानेवारीला पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख शिक्षक भारती महाराष्ट्र यांच्याकडून मिळाली आहे.