बाळासाहेबांचं जुना व्हिडिओ शेअर करत, जितेंद्र आव्हाडांनी म्हंटले ही तर ‘ काळाची गरज.! ‘

| मुंबई | व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याबद्दल निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचे शिवसेनेने अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही पाठराखण होताना दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ शेअर करत आव्हाडांनीही अप्रत्यक्ष समर्थन केल्याचे दिसत आहे.

“काळाची गरज……” असे लिहित जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. आव्हाड यांनी थेट उल्लेख केलेला नसला, तरी मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याबद्दल निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीची घटना ताजी असल्याने याचा संदर्भ जोडला जात आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या व्हिडीओ मध्ये काय आहे..?

“साहजिक आहे… कारण नसताना तुमच्या कोणी कानफटात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल, वा छान, मस्त बसली, आणखी जोरात मारायला पाहिजे होती… इतका बुळचटपणा बरा नव्हे. त्याचा फटकन आवाज आल्यानंतर आपला काडकन आवाज आला पाहिजे. तो शिवसैनिक… नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नकोत, कानफटात मारण्यासाठी तयार ठेवा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *