| पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सलग चौथ्यांना मुख्यमंत्रीपदावर विजारमान होण्यासाठी नितीश कुमार यांना संधी मिळणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवत मॅजिक फिगर गाठली आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे. ( NDA WINS BIHAR, NITISH KUMAR , TEJASWI YADAV )
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती आले आहेत. १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपने, ४३ जागा जेडीयू आणि मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महागठबंधनने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी आरजेडी केली आहे. तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
महागठबंधनमधील काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीएला बहुमत मिळाल्याने नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .