| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवण येथील कोरोना केअर सेंटर उद्घाटना पासूनच चर्चेत आहे. तो वाद संपतो न संपतो. तोच तालुकास्तरावर काम केलेले भाजपचे एक पदाधिकारी कोरोना पॉझिटिव निघाले.आणि कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले.त्यानंतर काही दिवसांनी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती ही कोरोना पॉझिटिव निघाल्याने भिगवन कोविड सेंटरमध्ये मध्ये दाखल झाले होते. त्यावेळेसच एकमेकांच्या संपर्कात असणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आता कोणाचा नंबर असणार याविषयी चर्चा झडू लागल्या होत्या. त्यामुळेच की काय आता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले युवा पदाधिकारी आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य कोरोना पॉझिटिव निघाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांची मैत्री हा परिसरात एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्यातच दोघांची चाचणीही एकाच वेळी पॉझिटिव निघाल्याने हा “याराना… हम नही छोडेंगे” असाच असल्याचे दिसू लागलेले आहे. त्यातूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसे व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केलेले आहेत. उद्योगव्यवसायाच्या निमित्ताने सतत ची भ्रमंती असल्यामुळे तसेच तरुणांचा मोठा संपर्क असल्याने वेगवेगळे राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ आदींनाही हे पदाधिकारी उपस्थित राहत असल्यामुळे संपर्कात आलेल्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
इंदापूर तालुक्यातील अनेक राजकीय नेते कोरोनाने बाधित असल्याने इंदापूर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. रोजचे वाढणारे रुग्ण कोरोणाचा फैलाव किती वेगाने होतो आहे. हेच दाखवून देत आहेत. दि.8 रोजी इंदापूर तालुक्यामध्ये एकूण 112 रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. त्यामध्ये भिगवण कोविड सेंटरमधील 11 अहवाल पॉझिटिव्ह आहेत.तर तालुक्यात रॅपिड एंटीजन टेस्ट करणारे एकूण73 रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहे तर दिनांक 9 रोजी भिगवनमध्ये 6 अहवाल पॉझिटिव्ह तर तालुक्यात रॅपीड टेस्टमध्ये 42 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आता इंदापूर तालुका लॉक डाउन करण्याच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष सकारात्मक असलेले दिसून येत आहेत. कारण परिस्थिती खूपच हाताबाहेर चाललेली आहे. त्यामुळे वेळेतच योग्य निर्णय घेतले नाहीत तर त्याचे दुष्परिणाम तालुक्यातील जनतेला निश्चितच भोगावे लागणार आहेत.
त्यातच व्यापारी वर्गामध्ये नियोजित बंदबाबत सकारात्मक चर्चा आहे. मात्र याबाबत भिगवण पोलिस स्टेशन तसेच परिसरातील भिगवण, मदनवाडी, तक्रारवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन लॉकडाऊनबाबत सविस्तर माहिती द्यावी अशीही मागणी होत आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .