भिगवण पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; अकोले ता. इंदापूर येथून गावठी पिस्तुल व 4 जिवंत काडतुसे जप्त..

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवण पोलीसांनी भिगवण पो.स्टे. हद्दीत मौजे अकोले ता.इंदापूर जि.पुणे गावचे हद्दीतील गणपती मंदिरासमोरील रोडवर आरोपी दादासो रामचंद्र दराडे रा. अकोले याच्या ताब्यातील मारुती सुझुकी एस क्रॉस MH 42.AS. 0008 या गाडीमधून एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्तुल, 4 जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत असताना त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून बेकायदा बिगर परवाना व बेकायदेशीर हेतुस्तव बाळगलेले अग्निशस्त्र व काडतुसे असा एकुण किं.रु. ५,५०,८०० / – चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

दाखल गुन्ह्यातील दुसरा आरोपी महादेव चंद्रकांत दराडे रा. अकोले यासही शिताफीने अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. महामार्गावरील सातत्याने घडणाऱ्या लुटमारीच्या छोट्या मोठ्या घटनांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून वरील आरोपींना अटक केली आहे.

सदरची कामगिरी भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली
पो हवा/126 नाना वीर, पो ना /2244 गोरख पवार, पो ना /1838 इन्कलाब पठाण यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.