| भोपाळ | मध्य प्रदेशातील २८ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या केवळ ५ दिवस आधी भाजपने आपला जाहिरनामा जाहीर प्रसिद्ध केला. अलिकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना मात्र जाहीरनाम्यात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांचा साधा फोटोही जाहिरनाम्यात नाहीए. तसंच मध्य प्रदेशातील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचं आश्वासन पक्षाने दिलं आहे.
जाहिरनामा प्रसिद्ध होण्याच्या ५ दिवस आधी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात फक्त गरीबांनाच मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली होती. ग्वाल्हेरमध्ये भाजपाचे उमेदवाराच्या प्रचारसभेत त्यांनी ही घोषणा केली. यानंतर त्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मोफत दिली जाईल, असं ट्विट केलं. पण नंतर काही काळानंतर त्यांनी हे ट्विट हटवलं. मुख्यमंत्र्यांचं ट्विट आणि नंतर ते हटवल्याने कोरोना लसीबाबत राज्यात संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करत पक्षाने आपल्या जाहिरनाम्यातून संपूर्ण जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचं आश्वासन दिलंय.
जाहीरनाम्यात शेतक-यांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलंय आहे. यात सरकारने शेतक-यांसाठी घेतलेले निर्णय आणि योजनांचा उल्लेखही आहे. त्याशिवाय स्थानिक प्रश्नांविषयी स्वतंत्र स्तंभ तयार केला गेला आहे. त्यामध्ये विधानसभा स्तरावर विकासाच्या स्थानिक प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
काँग्रेसचा भाजपवर निशाणा
कोरोनावर अजून लसही आलेली नाही तरीही मोफत लस देण्याचं आश्वासन भाजपने जाहिरनाम्यातून दिलंय. भाजप कोरोनासारख्या आजाराचाही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .