भाजपच्या नेत्याचा सैन्यातील जवानावर गोळीबार..!

| भोपाळ | मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपाच्या एका नेत्याने सैन्याच्या जवानावर गोळी झाडली. मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली. गोळीबाराच्या या घटनेत जवान जखमी असून त्याची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात या जवानावर उपचार सुरु आहेत. मुरैना जिल्ह्यातील मिढेला गावाती ही घटना घडली. दैनिक जनसत्ताने हे वृत्त दिले आहे.

भाजपा नेते आणि वर्तमान नगरपालिकेचे उपाध्यक्ष नीतू तोमर आणि त्यांच्या साथीदारांवर अंशू तोमर यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. अंशू तोमर सैन्यात आहेत. गोळीबाराची घटना घडली, त्यावेळी अंशू तोमरचा मित्रही तिथे उपस्थित होता. त्यानेच भाजपा नेत्यावर गोळी चालवल्याचा आरोप केला आहे.

रिपोर्ट्सनुसार अंशू तोमर मेरठमध्ये तैनात होता. दोन दिवसांच्या सुट्टीवर तो मुरैना येथे आला होता. शनिवारी आम्ही बाईकवरुन अम्बाह शहर फिरत होतो. त्यावेळी भाजपा नेता नीतू तोमर बरोबर गाठ पडली. त्यानंतर नीतू तोमरने आपल्या साथीदारांसह अंशूच्या बाईकचा पाठलाग केला व मिढेला गावाजवळ त्याच्यावर गोळी झाडली. पोलिसांना माहिती मिळताच ते लगेच घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी असलेल्या जवानांला लगेच ग्वालियर येथे नेण्यात आले. जखमी जवान आणि त्याच्या मित्राने दिलेल्या जबानीच्या आधारावर तपास केला जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *