भाजपवर गंभीर आरोप : गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केल्याने मला पक्ष सोडायला भाग पाडले..

| मुंबई | एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णयनंतर राज्याच्या राजकारणात अनेक गौप्यस्फोट होऊ लागले आहेत. खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना झालेल्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केल्याने मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले होते. मला तिकिटही नाकारण्यात आले होते. आता खडसेंच्या बाबतीतही तेच घडलेय, असा आरोप शेंडगे यांनी केला आहे.

खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मी दिवंगत गोपीनाथ मुंडेंसोबत राजकीय जीवनात काम केले होते. त्यांच्यासोबत ओबीसी समाजातील अनेक नेते होते. एकनाथ खडसे हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. २०१४ मध्ये ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर मी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र त्या मागणीमुळे मला पक्ष सोडावा लागला होता. निवडणुकीत माझं तिकीटही कापण्यात आलं होतं, असा दावा शेंडगे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.