भाजप मध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतुर – मंत्री नवाब मलिक

| मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षात येण्यासाठी आतूर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधाक दोन्ही एकमेकांचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आलेले आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांनी आणखी एक दावा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कोण कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘काही लोकं राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची अफवा पसरवत आहेत. हे तथ्यहिन आणि चुकीची बातमी आहे. उलट भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर आहेत. पण याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरत निर्णय घेऊन माहिती सार्वजनिक केली जाईल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *