भारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा..!

| मुंबई | आज समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने भारत बंदचे आव्हान करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहे त्याचा जाहिर निषेध करण्यासाठी या भारत बंद चे आयोजन आहे. केंद्र सरकारने पारीत केलेले हे कृषी कायदे मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी केले असून शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रतिनीधीसोबत चर्चा न करता हे कायदे संसदेत लोकशाही विरोधी पद्धतीने मंजूर केले आहेत. 

त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. सर्व कामगार कोणत्या ना कोणत्या प्रकारे कृषिसंस्कृती सोबत निगडित असून बळीराजाच्या या बिकट परिस्थितीत त्यांच्यासोबत असणे व त्याला मानसिक पाठबळ देणे कर्मचारी संघटनेचे कर्तव्य आहे. त्यामुळे केंद्रसरकार विरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला आमचा पूर्णपणे पाठींबा असून आम्ही या आंदोलनात शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंबंधीचे निवेदन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिले असल्याची माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे.

संघटनाध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी केंद्र सरकारने दिनांक ९ च्या चर्चेत या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *