मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत भरघोस वाढ; जगात चौथे स्थान..! वाचा कोण आहे त्यांच्या पुढे..

| मुंबई | सध्या सर्वत्र उद्योगांवर संकटाचे सावट आहे. असे असताना या कोरोना काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तब्बल २२ अब्ज डॉलर्सची संपत्ती कमवली आहे. यामुळे आता त्यांची संपत्ती ८१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. त्यामुळे आता ते आता जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. ब्लूमबर्ग इंडिकेशनने दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांनी यावर्षी २२ अब्ज डॉलर्स नफा कमावला आहे. संपत्तीमधील या वाढीमुळे त्यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकून अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये प्रथम क्रमांकावर तर अॅमेझॉनचे जेफ बेजोस तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स दुसऱ्या आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

अॅमेझॉनचे जेफ बेजोस हे जगातील श्रीमंताच्या यादीत मुख्य स्थानावर कायम आहेत. ब्लूमबर्ग इंडिकेशनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर एवढी आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत ७२.१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांची एकूण संपत्ती १२१ अब्ज डॉलर आहे. गेट्स यांच्या संपत्तीत ७.५१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती १०२ अब्ज डॉलर आहे. झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत २३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.मार्क झुकेरबर्ग हे पहिल्यांदाच १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाली आहेत. जगातील फक्त तीनच व्यक्तींची संपत्तीचा सहभाग यामध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *