मुख्यमंत्र्यांना फोन करून धमकी देणाऱ्यांना कोलकत्त्यातून अटक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची कामगिरी..!

| मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास्थान असलेल्या मातोश्रीवर काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकी, अशी धमकी दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या रायगडमधील फार्म हाउसची काही अज्ञातांनी रेकी केली होती. यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दया नायक यांनी मोठी कारवाई करत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. नायक यांनी कोलकातामधून आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आज ४ वाजता पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन करण्यात आले होते.त्यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रायगडमधील खालापूर तालुक्यातील भिलवले येथे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाउसवर टुरीस्ट कारने आलेल्या ३-४ जणांनी रेकी केली होती. फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे विचारपूस करण्यात आली होती. याप्रकरणी मुबंई एटीएसने नवी मुबंई टोल नाक्यावर रेकी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *