
| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा फोनही भारताबाहेरून आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले आहेत. या फोन प्रकरणाची चौकशी आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांची क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीने ३ ते ४ फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती पुढे आली होती
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..