मुख्यमंत्री, मंत्री आणि खासदार यांच्या प्रतिज्ञापत्रावर चुकीची माहिती भरली असल्याचा आक्षेप..!

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे आणि एनसीपी खासदार सांसद सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व नेत्यांवर निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती देण्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचं गांभीर्य पाहता निवडणूक आयोगाने याचा तपास सीबीडीटीला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नेत्यांशिवाय गुजरात आमदार नाथाभाई ए पटेल यांच्या विरोधातही निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि त्यांच्यासोबतच्या एनसीपीच्या नेत्यावर आरोप आहे की यांनी निवडणुकीच्यावेळी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी चुकीची माहिती असून काही रकाने अर्धवट आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारकर्त्याने आपल्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी काही कागदपत्रं सोपवली आहेत. ज्यावरुन या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती असल्याचे समोर आले आहे. या डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाने याचा तपास सीबीडीटीला पाठविली आहे.

एखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास सध्याच्या कायद्यानुसार सहा महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *