माजी आमदार राहुल जगताप यांनी केले घोड धरणाचे जलपूजन..!

| श्रीगोंदा | निसर्गाच्या कृपेने श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेले घोडधरण ९५ टक्के भरून आज घोडनदीला व घोडच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्यानां पाणी सोडण्यात आले. म्हणून श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री. राहुल दादा जगताप पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन घोड धरणावर जाऊन आज विधीवत जलपूजन केले तसेच मनःपूर्वक प्रार्थना केली की निसर्गाची अशी कृपा कायम राहावी. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान कायम पाहायला मिळावी अशी प्रार्थना परमेश्वर चरणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री घनश्याम शेलार , काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री दिपक पाटील भोसले , श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.मनोहर दादा पोटे, श्री बाळासाहेब पाचपुते, श्री रामभाऊ भोसले, श्री संभाजी दिवेकर तसेच श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक श्री सतीश मखरे, श्री गणेशजी भोस, श्री राजू लोखंडे तसेच शेतकरी व मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *