“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत अकोले येथे 673 लोकांची तपासणी; घेतलेल्या 25 स्वाबपैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह.

| इंदापूर / महादेव बंडगर | जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यामार्फत आदरणीय नामदार दत्तामामा भरणे, खासदार सुप्रियाताई सुळे मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटांमधील अकोले मधील गावठाण , वायसेवाडी,धायगुडे वाडी,दराडे वस्ती नं- 1,2, गायकवाड वस्ती, मालवस्ती, चौधरी वस्ती, सोने वस्ती, कंबळे वस्ती,येथून घरोघरी जाऊन सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

आज अकोले येथे 673 कुटुंबातील लोकांचा16 पथकांद्वारे आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सी मीटर, पल्स मीटर व थर्मामीटर च्या साह्याने नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. जे नागरिक तपासणीवेळी उपस्थित होते. ज्या- ज्या नागरिकांना कोरोणाची लक्षणे आढळून येतील त्या नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात आली आहे. यामध्ये आज 25 लोकांचा स्वाब घेतला. त्यामध्ये 1 जण पॉझिटिव्ह व 24 जण निगेटिव्ह आले. जेणेकरून भविष्यात वाढणारा धोका टाळण्यास मदत झाली. त्यामुळे कोरोणा नियंत्रणात येण्यास मदत होईल.

आजच्या या मोहिमेत जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी दादा वणवे, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ रामचंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महाजन, पोलीस उपनिरीक्षक श्री शेख साहेब , प्रशासक श्री दिलीप जगताप, ग्रामसेवक पवार,तुकाराम शिंदे, शामराव पाटील, वणवे,पोलीस पाटील सुबनावळ, सोलनकर, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, आशा ,शिक्षक यांनी सहभाग घेतला . या सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली.माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही जिल्हा परिषद ची संकल्पना अकोले गावात कोरोना ला हद्दपार करण्यास उपयुक्त ठरेल असा आशावाद ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *