| मुंबई | उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात आयोगाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे.
आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणा-या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सर्व परीक्षांसाठी उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत. त्यापैकी भाग-१(मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो. तर भाग-२(कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारास देण्यात आली आहे.
उमेदवारांने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर सविस्तरपणे उद् घृत केलेल्या सूचनांनानुसार नोंदवणे(वर्तुळ छायांकित करणे) गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या भाग-२(कार्बन प्रत) वरून उमेदवारास त्याने संबधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालकेवरून पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारास प्राप्त होऊ शकणा-या गुणांचा अंदाज बांधता येतो.
उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी खालील तपशील संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण आणि उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा.
आयोगाचा उपरोक्त निर्णय १ ऑक्टोबर २०२० नंतर आयोजित होणा-या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .