मोठी भरती : १२ हजार ५०० पोलिसांची भरती होणार, मराठा तरुणांना देखील न्याय मिळवा, ही सार्वत्रिक मागणी..!

| मुंबई | कोरोना महामारीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या संकटात राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम झाला. आर्थिक अडचणीत आल्यामुळे सरकारनेही विविध भरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलिस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलिस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला.

अनिल देशमुखांनी याबाबत सांगितले की, ”आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. भरतीची प्रक्रिया लवकर सुरू होईल.”

दरम्यान, मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती आणि एवढी मोठी भरती यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली असताना या मेगा भरतीत मराठा समाजाला योग्य न्याय देण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *