मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दाखविला आपला संवेदनशीलपणा..! या संबंध गावाने केला सलाम..!

| लातूर | राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री, संवेदनशील मंत्री एकनाथ शिंदे यांनी माता – पित्यांचे छत्र हरपलेल्या आणि दहावीत ९३.२० टक्के गुण मिळविलेल्या कु. रेणुका गुंडरे हिला दत्तक घेवून तिच्या पुढील शिक्षणासाठी लाखमोलाची मदत केली आहे. त्यामुळे अनाथांचा नाथ-एकनाथ – पुन्हा एकदा अनाथांचा नाथ बनले, अशी प्रतिक्रिया होकार्ण गावक-यांनी दिली आहे.

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील होकर्णा गावातील कु. रेणुका गुंडरे ही इयत्ता दहावीत ९३.२० टक्के मिळवून उत्तीर्ण झाली,पण या यशात एक दुःखाची झालर असल्याचे शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित माहिती घेतली तेव्हा कळाले की कु. रेणुका गुंडरे हिच्या वरील माता-पित्यांचे कृपाछत्र हरविल्याने लहान वयातच कुटुंबाच्या पालनपोषणाची जवाबदारी पेलणे रेणुका करिता खरोखर एक शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, असे एकनाथ शिंदे यांना जाणवले. रेणुका सारख्या हुशार विद्यार्थिनीला शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये आणि दोन धाकट्या भावंडाचे जवाबदारी पेलता यावी यास्तव कु. रेणुका आणि भावंडाचे पालकतत्व स्वीकारण्याची जवाबदारी शिंदे यांनी घेतली आहे. यासाठी ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांनी लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख या नात्याने आज कु. रेणुका गुंडरे हिच्या निवासस्थानी उपस्थित राहून डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने प्राथमिक स्वरुपी एक लाखाची आर्थिक मदत सुपूर्द केली.

यावेळी सोबत उदगीर-जळकोट विधानसभा संपर्कप्रमुख ऍड.निवास क्षिरसागर, जिल्हाप्रमुख नामदेव चाळक,सिनेट सदस्य व युवासेना जिल्हा विस्तारक प्रा. सूरज डांबरे, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आढवळे बालाजी रेड्डी, गोपाळ माने, नगरसेवक चाकूर न.पं. व युवासेना जिल्हा विस्तारक कुलदीप, उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,जळकोट तालुकाप्रमुख संग्राम टाले, माजी सभापती ब्राह्मजी केंद्रे, युवासेना उपजिल्हा विस्तारक रमण माने,अमर बुरबुरे तसेच शिवसेना वैद्यकिय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय सहाय्यक प्रसाद सूर्यराव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *