मदनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वेक्षणासाठी आवश्यक साहित्यांचे वाटप..

| इंदापूर / महादेव बंडगर | “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2020 रोजी मदनवाडी गावची संपूर्ण लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे.त्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींना तात्काळ संदर्भित केले जाणार आहे. त्यामुळे या तपासणीसाठी आवश्यक असणारे साहित्य फेस शील्ड,ऑक्सिमिटर, थर्मल गन यांचे वाटप मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ आम्रपाली बंडगर, उपसरपंच तेजस देवकाते ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री शिवाजी देवकाते ,गणपत ढवळे, सोमनाथ गुरगुळे, राजेंद्र देवकाते, समृद्धी प्रतिष्ठान चे अध्यक्ष कुंडलीकभाऊ बंडगर, ग्रामसेवक श्री. गाताडे, आरोग्य सेवक श्री. ससाने तसेच मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा स्वयंसेविका याप्रसंगी उपस्थित होत्या.

तपासणीदरम्यान कोणीही बाहेर गावी जाऊ नये,100 % लोकसंख्येची तपासणी व्हावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच आपल्याला असणाऱ्या वेगवेगळ्या आजारांची सत्य व वस्तुनिष्ठ माहिती आलेल्या सर्वेक्षकांना द्यावी .त्यामुळे आपल्या गावाचा कोरोना पासून बचाव करता येऊ शकतो असे आवाहन सरपंच आम्रपाली बंडगर व उपसरपंच तेजस देवकाते यांनी गावातील सर्व नागरिकांना केले आहे.

उपसरपंच तेजस देवकाते यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदनाद्वारे रॅपिड अँटीजन टेस्ट सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीमुळे हे सेंटर भिगवण पोलीस स्टेशन च्या शेजारी असणाऱ्या ट्रामा केअर सेंटर येथे 21 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले असून कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा काही लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ या सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी असेही तेजस देवकाते व भिगवण कोविड सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मृदुला जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *