
| नवी दिल्ली | मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत करार केला आहे.
सीजीआय इंडिया ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असून अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत येणाऱ्या 100 शाळांना तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी व नाविण्यपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार झाली आहे.
करारातंर्गत सीजीआयने, मुंबईसह, बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद येथील 100 शाळा दत्तक घेतल्या आहेत. सीजीआय इंडियाचे तांत्रिक प्रशिक्षक विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञानाविषयी गोडी वाढवून त्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देतील. सीजीआय निवडक शाळांमध्ये शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाविषयक प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आयोजित करतील.
अटल इनोव्हेशन मिशन केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. याअंतर्गत भारत सरकार देशभरातील नाविण्यपूर्ण, उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. अटल इनोव्हेशन मिशनतंर्गत येणाऱ्या एटीएलमध्ये देशभरातील 2.5 दशलक्षाहून अधिक शाळेकरी विद्यार्थी समाविष्ट आहेत. एटीएलतंर्गत असणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वत: काही वेगळे करण्यासाठी प्रशिक्षण किट दिली जाते. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला यामुळे अधिक वाव मिळतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा उत्कृष्टपणे करता येईल याचे याअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री