| मुंबई | विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी माझे अजून एक गाणे येत आहे, त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांचे स्वागत असल्याचे म्हणत आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली. पण नेटकऱ्यांनी अमृता यांनी केलेली घोषणा आणि त्यामधील ट्रोलिंगचे आमंत्रण फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसत असल्यामुळेच अमृता यांच्या गाण्यासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर हे गाणे येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अमृता यांचे नवे गाणे येत्या गुरुवारी येणार असून हे गाणे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी रिलीज केले जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाइन याचिकेचे काही तासांमध्ये अनेक जणांनी समर्थन केले आहे.
हे गाणे एका सस्पेन्स चित्रपटातील असल्याचे अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले. तसेच हे येणारे नवीन गाणे हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणे एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असे आवाहनही अमृता यांनी केले. पण हे गाणे रिलीज होण्याआधीच ट्रोलर्सने अमृता यांना पुन्हा लक्ष्य केले आहे.
हुनमंत ढोमे नावाच्या युझरने सोमवारी (१४ डिसेंबर २०२०) रोजी चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये, अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. अमृता यांचा या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये उल्लेख मामी असाही करण्यात आला आहे. पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे असल्याचे या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे, आपला कान, आपली जबाबदारी, असेही लिहिण्यात आले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .