| मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकरही उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली.
‘याचिका घटनापीठाकडे पाठवताना अनपेक्षितपणे आरक्षणाला स्थगिती दिली. आज विरोधी पक्षनेत्यांनी आपण सरकारसोबत आहोत, असं आश्वासन दिलं आहे. यात कोणतंही राजकारण नाही. सर्व पक्ष एकत्र आहेत. आरक्षण स्थगिती असताना मराठा विद्यार्थ्यांना काय दिलासा द्यायचा याबाबत चर्चा झाली,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडे तीन पर्याय’, सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीसांचं वक्तव्य
‘पर्याय कोणता, यावर मी नंतर बोलणार. आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली. इतर घटकांशीही चर्चा करायची आहे. आंदोलन करु नका, मी पुन्हा आवाहन करतो,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .