
| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व मंडलाधिकारी मकरंद तांबडे यांना देण्यात आले.
यादरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, मराठा समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या दरम्यान सर्वच श्रोत्यांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त केला. सध्या खूप आशेने मराठा समाजातील तरुण शिक्षण, नोकरी यासाठी कष्ट घेत होते. परंतु न्यायालयाने दिलेल्या स्थगितीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विविध अभ्यासक्रमाला घेतलेले प्रवेश अडचणीत येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे याबाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेऊन समाजाला न्याय देणे गरजेचे आहे. अशा प्रतिक्रिया तरुण व्यक्त करू लागले आहेत.
यावेळी मोर्चेकऱ्यांकडून पुढील मागण्या करण्यात आल्या.राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव टाकून आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी,सारथीला आर्थिक निधी व मनुष्यबळ देऊन गतिमान करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून आजपर्यंत 17000 लाभार्थींना सुमारे 1076 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. त्याच्या व्याज परतावा योजनेसाठी चालू वर्षी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यासाठी तरतूद करावी. मंत्रिमंडळ समितीची कार्यकक्षा वाढवून त्यात इतर विषय समाविष्ट करावेत, चालू वर्षी होणाऱ्या पोलिसभरतीत SEBC वर्गाबाबत काय धोरण ठरवणार ते जाहीर करावे. इतर सर्व नोकर भरतीला स्थगिती द्यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या सर्व मागण्यांचा सरकारने जर सकारात्मक विचार केला नाही तर, भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे शांततेत मोर्चा पार पडला.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!