मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट..!

| मुंबई | मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. या शिष्टमंडळात प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे या सगळ्यांची उपस्थिती होती. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही यावेळी उपस्थित होते. करोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता या कलाकारांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.

काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने नाट्यगृहं, सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती दिली आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरची नाट्यगृहं, सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती देण्यात आली आहे. नाट्यगृह, सिनेमागृहं यांच्या एकूण आसन क्षमनतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. दरम्यान करोना आणि लॉकडाउनच्या काळात मराठी कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता हळूहळू नाट्यगृहं सुरु होत असली तरीही अडचणी संपलेल्या नाहीत. आपल्या याच अडचणी मराठी कलाकारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या.

काही दिवसांपूर्वीच कोळी महिलांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईचे डबेवाले यांनीही राज ठाकरेंची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या होत्या. त्यांच्या प्रश्नांवर समाधान शोधू असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं होतं. आता आज मराठी कलाकारांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *